युवा महोत्सवात कीर विधी महाविद्यालयाच्या राधा टिकेकर हिला एकपात्रीत सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाचा नवा इतिहास रचला आहे. राधा टिकेकर हिने हिंदी एकपात्री अभिनय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अभिनयाचा डंका वाजवला आहे.
अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण विद्यापीठ विभागातील मातब्बर कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अंतिम फेरीत राधाने आपल्या अमोघ अभिनय कौशल्याने, अचूक संवादफेकीने आणि प्रभावी सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या या सुवर्ण यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. स्पर्धेसाठी राधा टिकेकर हिला संचालक दीपक माणगावकर आणि ओंकार पाटकर यांचे मोलाचे व तांत्रिक मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संयोगिता सासने आणि प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांचेही प्रोत्साहन लाभले. या कामगिरीबद्दल राधाचे अभिनंदन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button