
अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी तरूणावर पोस्को अंतर्गत गुन्हा.
संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी तुळसणी येथील रासिक कासम बोट या २४ वर्षीय तरूणावर सोमवारी पॉक्सो अंतर्गत देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत देवरूख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रासिक हा गेली दीड वर्षे एका गावातील अल्पवयीन मुलीला दूरध्वनी करून पाठलाग करणे, तसेच प्रत्यक्ष भेटून नाहक त्रास देत होता.
या प्रकरणी रासिक याला समज देण्यात आली होती. मात्र रासिक याच्या वागण्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. अखेर रासिक याच्या त्रासाला कंटाळून या मुलीने सोमवारी देवरूख पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. या मुलीचे नातेवाईक आक्रमक झाले होते.www.konkantoday.com