
आबालवृद्ध अशा सर्वांसाठी भगवद्गीता उपयोगीरत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांचे गौरवोद्गार.
रत्नागिरी उपकेंद्रात गीता जयंती साजरी प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार गीता प्रत्येकाला उपयोगी आहे बालांसाठी बालसाहित्य म्हणून तर थोऱ्या मोठ्यांसाठी एक तत्त्वज्ञान म्हणून तर युवकांसाठी व्यवस्थापन शास्त्र म्हणून गीतेकडे पाहिलं जात त्यामुळे आबालवृद्ध अशा सर्वांसाठी गीता उपयोगी असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांनी केले. ते गीता जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र येथे बुधवारी गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने उपस्थितांना संचालक डॉ दिनकर मराठे यांनी उद्बोधन केले शिवाय गीतेतील 12 व्या अध्यायाचं सामूहिक पठण करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यार्थी रत्नागिरी उपकेंद्रातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.