
तिलारी घाटातील तीव्र उताराच्या वळणावर पडलेल्या ऑईलमुळे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो घसरून उलटला
तिलारी घाटातील तीव्र उताराच्या वळणावर पडलेल्या ऑईलमुळे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो घसरून उलटल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.तिलारी घाटातील एका तीव्र उताराच्या वळणावर एका गाडीतून ऑईल पडले होते. या ऑईलमुळे अनेक दुचाकी घसरून पडल्या. शिवाय काही चारचाकी वाहने देखील घसरून अपघात झाले. चंदगडहून गोव्याच्या दिशेने ब्रॉयलर कोंबडी घेऊन जाणारा महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी घाटातील या वळणावर आली असता ती घसरली. परिणामी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पलटी झाली. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. गाडीचेही मोठे नुकसान झाले.