
चिपळुणात पाण्याच्या पाईपलाईन फुटीचे वाढते प्रकार.
चिपळूण शहरात सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्ग व जीओच्या केबलच्या कामामुळे सातत्याने पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन ठिकठिकाणी फुटत आहेत. याचा नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीची कामेही करून देण्यास संबंधित कंपन्या टाळाटाळ करीत असल्याने नगर परिषद प्रशासन हैराण झाले आहे. काही दिवसांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणार्या खेर्डी व गोवळकोट येथील जॅकवेलच्या विद्युत पुरवठ्यात एकाचवेळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा चार दिवस बंद होता. यामुळे काही भागातील नागरिकांचे हाल झाल्याने त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. www.konkantoday.com