
उमेदच्या महिलांचे बेमुदत उषोषण आंदोलन.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या महिलांचे बेमुदत उषोषण आंदोलन शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले. रखरखत्या उन्हाची तमा न करता मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी आपल्या मागण्यांसाठी त्यांनी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३ हजारपेक्षा जास्त महिला आणि कर्मचारी या उपोषण आंदोलनात सहभागी झाले