
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. 10 पैकी 9 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत, राखीव गटातील युवा सेनेचे सर्व पाच उमेदवार विजयी झाले आहे, तर खुला गटातील पाच पैकी 4 जागांवर युवासेनेच विजय मिळवला आहे.एका जागेवर अद्याप मतमोजणी सुरू असून या जागेवर देखील युवासेनेचाच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. थोड्याच वेळात मतमोजणी पूर्ण होऊन सर्व निकाल हाती येणार आहेत.मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी 28 उमेदवार रिंगणात होते.