
त्या प्रकरणानंतर कॉंग्रेस पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे पदमुक्त.
कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांना पदावरून त्वरित मुक्त करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या पर्यावरण सेलचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी त्यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या विचारधारेला बाधा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.रविवारी त्यांच्याबाबत घडलेल्या प्रकारची कॉंग्रेसच्या पर्यावरण सेलने गंभीर दखल घेतली आहे. जी काही माहिती उपलब्ध झाली आहे, ती माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. कॉंग्रेस पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे संदर्भात पदाधिकारी म्हणून अपेक्षाही पूर्ण करू शकले नसल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच घडलेल्या प्रकाराने पक्षाच्या विचारधारेला हानी पोहचली आहे. याचमुळे पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदावरून त्वरित मुक्त करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. www.konkantoday.com