पावसाचे थैमान सुरूच असल्याने नव्या जगबुडी पूल दुरूस्ती कामात अडथळा

मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरील उखडलेला भाग दुरूस्तीस पावसाचा अडथळा उभा ठाकला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. उखडलेल्या भागाच्या दुरूस्तीसाठी प्लास्टिक कापडाचा तंबू उभारून चौथ्या दिवशीही काम सुरूच आहे. उखडलेल्या ठिकाणी मध्यभागी सळ्यांचा वापर करून सिमेंट भरले जाणार आहे. मात्र पावसामुळे पुलावरील वाहतूक सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. पुलाचा मध्यभाग उखडल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू असल्याने दुरूस्ती कामाचा वेग मंदावला आहे. खचलेल्या भागात सळ्यांचा वापर करून भाग मजबूत केला जाणार आहे. यानंतर सिमेंटचा वापर केला जाणार आहे. पावसाच्या संततधारेने कामात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे पुलावरील वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button