
नवी मुंबईतल्या धबधब्याजवळ 40 ते 50 जण अडकले
मुंबई आणि आसपासच्या परिसरात मागच्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यातच रविवार असल्यामुळे धबधब्यांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईतल्या धबधब्याजवळ 40 ते 50 जण अडकले आहेत.नवी मुंबईच्या बेलापूर जवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी 40 ते 50 पर्यटक गेले होते.मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हे पर्यटक तिकडेच अडकून पडले आहेत. यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दल, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे. दोरखंडाच्या साहाय्याने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढलं जात आहे