
ऑनलाईन दाखले मिळवताना नागरिकांची गैरसोय -शौकतभाई मुकादम
सध्या सर्वच नागरीसुविधा केंद्राच्या माध्यमातून विविध दाखले हे ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहेत परंतु ही पद्धत नागरिकांना गैरसोयीची व वेठीस धरणारी ठरत असल्याने जिल्हाधिकार्यांनी याचा गांभीर्याने विचार करून तूर्त ऑफ लाईन दाखले देवून सहकार्य करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.सध्या उत्पन्नाचे अधिवासाचे असे विविध दाखले तसेच शिधापत्रिका ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात. नागरिकांना वेळ व पैसे वाचावे त्यांचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने शासनाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली परंतु सध्या त्याचा विपरित परिणाम समाजात होत आहे. शैक्षणिक कारणासाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी लागणारे दाखले ऑनलाईन प्रोसेसमुळे महिनोनमहिने मिळत नाही. ज्यांना गरज आहे त्यांनाच वारंवार फेर्या माराव्या लागत आहेत. www.konkantoday.com




