
कशेडी घाटात अपघाताचे सत्र कायम नायट्रोजन वाहतूक करणारा ट्रक घाटात सुमारे ७० फूट दरीत कोसळला
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघाताचे सत्र कायम असून बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नायट्रोजन वाहतूक करणारा ट्रक घाट चढत असताना मागे येऊन सुमारे ७० फूट दरीत कोसळून अपघात झाला.ट्रक चालक अफ़िजुल रहमान (५५) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक एम एच ०५ ए एम २८१४) हा ट्रक उरण येथून नायट्रोजन गॅस भरून लोटे एमआयडीसी कडे येत होता. घाटामधील चढण चढत असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामूळे पाठीमागे येत ट्रक थेट सुमारे ७० फूट दरीत कोसळून अपघात झाला.दरम्यान या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कशेडी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत ट्रक मध्ये अडकलेल्याचालकाला बाहेर काढले. दरीत कोसळलेल्या ट्रकमध्ये नायट्रोजन वायू होता