हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक करणार्‍या आरजू टेकसोलचे दिल्लीत मोठे गोडावून

स्थापन केलेल्या आरजू टेकसोलने रत्नागिरीकरांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. आरजू टेकसोल कंपनी या तीनच वर्षापूर्वी मिरजोळे एमआयडीसी येथे सुरू झाली. कंपनीतील आर्थिक घोटाळ्याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरू असताना एका गुंतवणुकदाराने तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीतील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यातील तिघांची पूर्ण माहितीच उपलब्ध नसून यातील मुख्य सूत्रधार कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान या एका तक्रारीनंतर फसवणूक झालेले ८५१ जण असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.आतापर्यंत परजिल्हा, राज्यातील व्यक्तींनी रत्नागिरीकरांना अनेकांनी आर्थिकदृष्ट्या फसविले आहे. मात्र आता स्थानिकांनीच कमी कालावधीत दुप्पट पैसे मिळवून देतो असे सांगत रत्नागिरीकरांना चुना लावला आहे. कोकणी माणूस हा हुशार, अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यातून अशा आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. असे असले तरीही फसवणुकीची मालिका मात्र कायम राहिली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button