परंपरागत गावपळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावाची गावपळण बुधवारी सुरू


दरवर्षी होणार्‍या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे गावाची गावपळण बुधवारी दुपारनंतर सुरू झाली आहे. ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शिराळेवाशीयांनी आपली गुरेढोरे, कोंबड्या, कुत्रे यांच्यासह गाव सोडत सडूरे गावच्या हद्दीत, दडोबा डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक अधिवासात उभारलेल्या राहुट्यांत आपला संसार थाटला आहे.वैभववाडीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसुली गाव असून येथे मराठा व धनगर समाजाची सुमारे 80 कुटुंबे आणि 350 लोकसंख्या आहे. षौष महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी होणारी ही गावपळण सुमारे 450 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असल्याची माहिती गावातील जाणकार वयोवृद्धांनी दिली.

सडूरे गावच्या माळरानावर तब्बल 40 राहुट्या उभारण्यात आल्या असून प्रत्येक राहुट्यांसमोर गुरांसाठी गाताड्या बांधण्यात आल्या आहेत. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंसह आबालवृद्ध, कडक्याच्या थंडीतही या गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button