
राज्यातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची तारीख जाहीर
राज्यातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. २४) जाहीर केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मदरासंघातील निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमनिवडणूक अधिसूचना- ३१ मे २०२४अर्ज भरण्याची शेवटची तारीख- ७ जून २०२४अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत- १२ जून २०२४मतदान- २६ जून २०२४ (सकाळी ८ ते सायंकाळी ४)मतमोजणी- १ जुलै २०२४ (सोमवार)www.konkantoday.com