
इंडिया आघाडीचे काम न केल्याने खेड कॉंग्रेस तालुकाध्यक्षांकडून तिघांचे निलंबन
रायगड लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी तिघांचे तडकाफडकी निलंबन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे तालुका कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पक्षनेतृत्व कोणती भूमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे, माजी नगरसेवक बशीर मुजावर, कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. www.konkantoday.com