
आंबेशेत कुर्टेवाडी येथे जागेच्या वादातून चौघांना मारहाण
रत्नागिरी शहरालगतच्या आंबेशेत कुर्टेवाडी येथे जागेच्या वादातून चौघांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी ५ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. गणपत विठोबा बाचरे (रा. आंबेशेत, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला. सुनिता शंकर बाचरे, रसिका मनोज बाचरे, आदेश मनोज बाचरे (रा. आंबेशेत रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.www.konkantoday.com