रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आचारसंहितेच्या अनुषंगाने धडक कारवाई

दिनांक १६/०३/२०२४ रोजी पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीमध्ये जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अवैध दारु विरोधी एकूण १११ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये ₹ ९,४२,६७८ किमतीची १,०४७ लिटर हातभट्टी, ७३.४८ लिटर विदेशी बनावटीची दारु, ४२.४८ लिटर देशी बनावटीची दारु सह रसायन जप्त करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये पोलीस दलामार्फत अंमली पदार्थ जप्तीच्या २ कारवाया करण्यात आलेल्या असून त्यामध्ये ४.२९४ कि.ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आलेला आहे.जिल्हयातील निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी एकूण ४२९ व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या आहेत. तसेच २,९६९ व्यक्तींना आपले शस्त्रे पोलीस ठाणेत जमा करण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या असून रत्नागिरी जिल्हयातील एकूण २,५५९ शस्त्रे जमा करण्यात आलेली आहेत. जिल्हयातील एकूण २१२ शस्त्र परवानाधारक मयत किंवा वयोवृद्ध असल्याने ते रद्द करणेबाबत मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button