एर्नाकुलम-ओखा रेल्वेही ५ एप्रिलपासून धावणार नव्या रूपात

__कोकण मार्गावर धावणार्‍या पोरबंदर-कोच्युवेली साप्ताहिक एक्स्प्रेस पाठोपाठ आठवड्यातून दोन दिवस कोकण मार्गे धावणारी लांब पल्यांची एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेसही ५ एप्रिलपासून नव्या रंग रूपात धावणार आहे. एक्सप्रेस आधुनिक प्रणालीच्या २२ एलएचबी डब्यांची धावणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत.भारतीय रेल्वे एलएचबी श्रेणीतील रेल्वेगाड्यांचा प्रवास आरामदारी अन सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकाच किफायतशीर करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणारी २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली साप्ताहिक एक्सप्रेसही २८ मार्चच्या फेरीपासून एलएचबी श्रेणीच्या नव्या रंगरूपातील डब्यांची धावणार आहे. यापाठोपाठच एर्नाकुलम-ओखा ही साप्ताहिक एक्सप्रेसही आता २२ एलएचबी डब्यांची धावताना दिसणार आहे.कोकण मार्गे धावणारी एर्नाकुलम-ओखा एक्सप्रेस ५ एप्रिलपासून तर परतीच्या प्रवासात ८ एप्रिलच्या फेरीपासुन जुन्या पारंपारिक डब्यांऐवजी एलएचबी डब्यांची धावणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button