
झरेवाडी येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सहा दिवसांनी परिसरात आढळला
रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सकाळी या महिलेचा मृतदेह सापडताच परिसरात खळबळ उडाली. वनिता वसंत कळंबटे (६५, रा. झरेवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वनिता कळंबटे या १९ मार्च २०२४ रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. या संबंधीची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांकडून व स्थानिक रहिवाशांकडून वनिता यांचा शोध घेण्यात येत होता. २५ मार्च रोजी वनिता यांचा मृतदेह हातखंबा शेतीफार्म कृषी नर्सरीच्या बाहेर आढळला, अशी नोंद पोलिसांत करण्ययात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. www.konkantoday.com