मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस खर्येवाडी येथे बनावट दारुने भरलेल्या टेम्पोवर सिंधुदुर्गनगरी पोलिसांची करावाई

मुंबई गोवा महामार्गावरील ओरोस खर्येवाडी येथे बनावट दारुने भरलेल्या टेम्पोवर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी करावाई केली. या कारवईत ५३ लाख रुपायांच्या मुद्देमालासह वाहन जप्त केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च रोजी एका टेम्पोमधून गोवाबनावटीची दारु गोवा-मुंबई महामार्गाने वाहतूक होणार असलेबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचून सकाळी १०.३५ वाजताच्या सुमारास गोव्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या टेम्पोची (क्रमांक MH-07-AJ-6059) तपासणी केला. हा टेम्पो गोवा बनावटीच्या दारुने भरलेले आढळून आला. पोलिसांनी या टेम्पो चालकाची अधिक चौकशी केली. तसेच टेम्पोतून ८२८ पुठ्याचे बॉक्स, त्यामध्ये ३८,४३,६००/- रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व १५,00,000/- रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण ५३, ४३, ६00/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button