बॉक्साईट वाहतुकीने  पोल्ट्री अडचणीत

मंडणगड तालुक्यातील मौजे चिंचघर ते महाड करंजाणी रेल्वे स्थानक या मार्गावर गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या अनधिकृत ओव्हरलोड बॉक्साईट वाहतुकीमुळे साठ कि.मी. अंतरावरील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या संदर्भात मंडणगड भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन थोरे यांनी गुरूवारी तहसीलला निवेदन देत कारवाईची मागणी केली.रात्रीच्यावेळी तालुक्यातील वलैते  येथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. रात्रभर या वाहनांच्या मोठ्या आवाजामुळे रस्त्याच्या नजिक असलेल्या सर्व पोल्ट्री व्यावसायिकांना या वाहतुकीचा प्रचंड त्रास होवू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ, वाहनांची धडपड याचा परिणाम पक्षांवर होेत आहे. कोणताही आजार अथवा रोग नसतानाही पोल्ट्रीतील पक्षांच्या मृत्यूत वाढ झाली आहे. अनेकांनी कर्जे उचलून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र अनधिकृत बॉक्साईट वाहतुकीमुळे हे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button