शासनाने चारापाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोकरे महाराजांचा गायींसह मोर्चा

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीसह राज्यात असलेल्या गोशाळेतील गायींना शासनाने चारा व पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वर्षभरात चौथ्यांदा उपोषण करणार्‍या ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कळंबस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालयावर ११०० गायींसह धडक मोर्चा काढला होता परंतु गोशाळेपासून महामार्गापर्यंत आल्यावर पोलिसांनी हा मोर्चा अडविला. येथे पशूधन आयुक्त धनंजय जगदाळे यांनी आश्‍वासन दिल्याने महाराजांनी गायी परत गोशाळेकडे नेल्या. दि. २ मार्चपर्यंत आपली मागणी मान्य झाली नाहीतर पुन्हा सर्व गायी घेवून आपण महामार्गावरून पशूधन कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांनी दिला. दरम्याने काल पोलादपूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बंडामहाराज धाडगे यांनी महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button