*वेगवान वार्‍यांमुळे हर्णैतील बंदरातील मच्छीमारी थंडावली*

____दोन दिवसात वातावरणातील बदल आणि वेगवान वार्‍यामुळे हर्णै बंदरातील मच्छिमारांनी सबुरीचे धोरण आखले आहे. त्यामुळे बुधवारपासून बर्‍याच नौका बंदरात उभ्या आहेत.वातावरणातील बदल आणि गेले दोन दिवस समुद्रात असलेले जोराचे वारे यामुळे सावधगिरी म्हणून हर्णैतील बहुतांश मच्छिमारांनी दोन दिवस किनार्‍यावरच थांबणे पसंत केलेले दिसत आहे. आधीस मासळी दुष्काळ आहे. त्यात आणखी धोका नको म्हणून अशी भूमिका घेतली आहे. मात्र यामुळे हर्णै बंदरातील उलाढाल मंदावणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button