
*आमदार साळवींच्या पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला*
__बेहिशोबी मामलत्ता प्रकरणी आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. लाचलुचपत विभागाकडून आमदार साळवी, पत्नी अनुजा राजन साळवी (५०), शुभम राजन साळवी (२८, रा. दोन्ही खालची आळी, रत्नागिरी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेच्या भीतीने शुभम व अनुजा साळवी यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होता.रत्नागिरी सत्र न्यायालयाने जामीन अर्जावर निकाल दिला. अर्जातील माहितीनुसार राजन साळवी तसेच त्यांच्या पत्नी व ३ कोटी ५० लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजन साळवी यांची वारंवार लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. नुकतेच २२ जानेवारी रोजी देखील आमदार साळवी यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.www.konkantoday.com