रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नियंत्रण अधिकारी उपस्थित राहणार


रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नियंत्रण अधिकारी उपस्थितटीचा नियंत्रण कक्ष कार्यरत होणार आहे. महिलांना ५० टक्के सवलत जाहीर झाल्यानंतर एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या अन्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सकाळी ५.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत नियंत्रण अधिकारी उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.

प्रकाश शिंदे आणि संजय वैशंपायन यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने श्री. बोरसे यांनी हे निवेदन दिले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक आणि रेल्वे फाटा हे बस स्टॉप एसटीच्या आरक्षण प्रणालीमध्ये आणावे तसेच एसटी महामंडळाने रेल्वे महामंडळासोबत चर्चा करून कायमस्वरूपी नियंत्रण कक्ष रेल्वे स्टेशनवर सुरू करावा, असे निवेदन प्रकाश शिंदे व संजय वैशंपायन यांनी एसटी विभागीय कार्यालय येथे दिले.

यावेळी एसटी आणि प्रवासी यांच्यासाठी आवश्यक बाबींबद्दल चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवकाळासाठी पुरेशा बसेस उपलब्ध असल्याचे प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले. तसेच बसेस सुस्थितीत ठेवण्याची पुरेशी तजवीज सर्व आगारांमध्ये करण्यात आली असल्याचे श्री बोरसे यांनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button