
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एका बहिणीचा जीव वाचवण्याचे कार्य पोलीस प्रशासनाने केले
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एका बहिणीचा जीव वाचवण्याचे कौतुकास्पद कार्य रत्नागिरी पोलिस प्रशासनाने केले
घरातील भांडणामुळे वैतागलेल्या महिलेनेखेड भरणे पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी तिथून जाणाऱ्या पोलिसांची नजर तिच्यावर पडल्याने त्याने धाव घेऊन महिलेला आत्महत्येपासून रोखून महिलेचा जीव वाचवण्याचं मोठं काम केलं ही कामगिरी जिल्ह्यातील खेड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे पुलाच्या दक्षिणेच्या बाजूस रेलिंग वरून संबंधित तरुणी जीव देण्याच्या तयारीत होती. २९ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राजेंद्र मुणगेकर आपल्या स्टाफ सह रत्नागिरी येथे ‘रत्नागिरी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा- २०२३’ च्या ‘सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभ’ या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथे हजर राहण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून सरकारी वाहनाने प्रवास करत होते. यावेळी त्यांना ‘एक तरुण महिला, भरणे नदी पुलाच्या उत्तर-दक्षिण वाहिके वरील रेलिंग वर चढून जगबुडी नदीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना दिसली. उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड पोलीस स्टेशन राजेंद्र मुणगेकर यांनी या तरुणीला तसे करताना पाहताच आपले सरकारी वाहन तिच्या जवळ वेगाने नेऊन थांबविले आणि लागलीच गाडीतून उतरून सोबत असलेल्या दोन अंमलदारांच्या मदतीने शिताफीने या महिलेचे दोन्ही हात पकडून तिला रस्त्याच्या सुरक्षित बाजूला आणले ती महिला आपल्याला जगायचे नाही असे सांगत होती.पोलिसांनी तिला धीर देत तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर आणि कर्मचाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन केले, तिच्या समस्येबाबत विचारपूस करून तिला धीर दिला. तसेच त्या महिलेच्या पतीलाही योग्य प्रकारे समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. झालेल्या वादामुळे टेन्शनमध्ये ही महिला टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत होती. सदर महिलेला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले या कुटुंबाला समुपदेशनाकरता संपर्कात राहण्याची सूचना पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांनी दिली आहे. पुन्हा असा प्रकार या कुटुंबात घडू नये म्हणून म्हणून आवश्यक ती काळजी घेऊन सूचना देण्यात आल्या
www.konkantoday.com