खेडशी येथील गुराखी मुलीच्या खूनप्रकरणातील संशयित तरूण निर्दोष

रत्नागिरी : खेडशी येथील जंगलात तीन वर्षांपूर्वी गुराखी मुलीचा खून झाल्याप्रकरणी खटला सुरू होता. सबळ पुरावा नसल्याने या संशयित तरुणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात  सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मुदस्सर डिंगणकर यांनी 4 साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून गुरुवारी जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी संशयिताची निर्दोष मुक्तता केली.
मैथिली प्रवीण गवाणकर (रा. चिंचवाडी खेडशी, रत्नागिरी) हिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घूण खून केल्याचा आरोप करण्यात आला होता. या खटल्यात नीलेश उर्फ उक्कु प्रभाकर नागवेकर (वय 35, रा. खेडशी भंडारवाडी, रत्नागिरी) असे त्या तरूणाचे नाव आहे. 9 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी ही घटना घडली होती.  
याबाबत मैथिलीचे वडील प्रवीण सिताराम गवाणकर (वय 43, रा. खेडशी भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांची मुलगी मैथिली ही बकर्‍या चरवण्यासाठी खेडशी येथील  जंगल परिसरात गेली होती. परंतु ती घरी न परतल्याने तिच्या आईने ही बाब प्रवीण गवाणकर यांना सांगितली. मैथिली कुठेही दिसून आली नाही.याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांना मैथिलीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी तपास केल्यानंतर ग्रामीण पोलिसांना ज्यावेळी मैथिली जंगलात बकर्‍या चरवण्यासाठी गेली होती तेव्हा नीलेशने तिची एक बकरी उचलून घेतली होती. त्यावेळी मैथिलीने “तू आमच्या बकर्‍या चोरतोस काय? बकरी सोड नाहीतर मी गावात सर्वांना तू माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोस, असे सांगेन” असे नीलेशला सांगितले.
आपली बदनामी होईल या भीतीने नीलेश तेथून निघून गेला होता. परंतु काहीवेळाने त्याने मैथिलीच्या पाठीमागून जाऊन तिच्या डोक्यात दगड मारून तिला ठार मारले होते, असा आरोप ठेवून हा खटला न्यायालयात सुरू होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button