
रेशन दुकानात फोन, विजेसह पाणी बिल भरु शकणार
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या रास्त धान्य दुकानांवर गहू, तांदूळ, साखर, डाळी मिळतात त्या रेशन दुकानांवर आता वीज, फोन आणि पाणी बिल भरता येणार आहे. विश्वास बसत नाही ना, परंतु हे खरे आहे. जिल्हा पुरवठा विभागाने इच्छूक दुकानदारांना नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या बिलं भरण्यासाठी होणार्या खेपा वाचणार आहेत. थोड्याच रास्त दुकानदारांनी यासाठी नोंदणी केली आहे.
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेबरोबरच फोन, वीज, पाणी बिल भरण्याची सुविधा ग्रामीण भागातील जनतेला एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने शासनाने ही सुविधा सुरू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील दुकानातून अजूनही प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यातील थोड्याच दुकानदारांनी ही सुविधा देण्यासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या दुकानदारांना शासनाने निश्चित केलेल्या कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
www.konkantoday.com




