गाभण गाईची हत्या केल्या प्रकरणी गुन्हा

दापोली : तालुक्यामधील धनकोली बौद्धवाडी येथे गाभण गाईची हत्या केल्याप्रकरणी जगदीश मर्चंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 21 मे रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. 4 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग मर्चंडे यांची सुमारे 30 हजार रुपये किमतीची 6 वर्षे वयाची गाभण गाय धनकोली येथील सहदेव मर्चंडे यांच्या जागेमध्ये चरत होती. तेव्हा जगदीश मर्चंडे याने हातातील लाकडी काठीने गाडीवर लाकडाने फटके मारले. यात गाय मृत झाली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या जगदीश मर्चंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश मर्चंडे याने गाईला मारतेवेळी गावातील अशोक मर्चंडे, नेहा मर्चंडे तसेच पांडुरंग मर्चंडे यांनी समक्ष पाहिले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button