
कोकणातल्या देवरुख सारख्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार्या इंदिराबाई हळबे मावशी यांचे कार्य आम्हाला सदैव प्रेरणादायी -मंत्री उदय सामंत
मातृमंदिर संस्थेच्या सुपरमल्टिस्पेशालिटी हॅास्पिटल च्या महत्वांकांशी मेघा प्रकल्पाच्या संकल्पित आराखडा आणि पहिल्या टप्याच्या संकल्पित प्रकल्पाचे अनावरण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचे हस्ते संपन्न झाले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवादलाचे कार्यकारी विश्वस्त आ. कपिल पाटील , अपना बॅंकेचे मानद अध्यक्ष मा. दत्ताराम चाळके आणि माजी आमदार सुभाष बने उपस्थित होते.
१९५४ साली फक्त दोन कॅाटच्या सहाय्याने कोकणातल्या देवरुख सारख्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देणार्या इंदिराबाई हळबे मावशी यांचे कार्य आम्हाला सदैव प्रेरणादायी आहे. या हॅास्पिटलचा विस्तार आणि पुनरुज्जीवनाचा भव्य प्रकल्प अभिजित हेगशेटये आणि त्यांचे सहकारी ज्या तळमळीने उभारत आहेत त्यातील एक लोकप्रतिनिधी , कार्यकर्ता आणि या राज्याचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी मोठी असून त्यासाठीच या कार्यक्रमाला राज्यांत जागतिक आरोग्य दिनी अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित असतांनाही प्राधान्याने उपस्थित राहिलो. असे उच्च शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. या ३० कोटीच्या सुपरमल्टिस्पेशालिटी प्रकल्पाची आज जिल्ह्यात नितांत गरज असून त्यासाठी सर्वाधिक सहकार्य करणे ही मी माझी जबाबदारी मानतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी अभिजित हेगशेटये यांनी मातृमंदिरच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतांना सुपरमल्टिस्पेशालिटी प्रकल्पात मान्यवरांनी येत्या काळात भरीव योगदान एक आपली जबाबदारी आणि ऋण म्हणून स्वीकारावी असे आवाहन केले. यावेळी आ. कपिल पाटील, दत्ताराम चाळके ( अपना बॅंक मानद अध्यक्ष ) यांची भाषणे झाली. मातृमंदिर अध्यक्ष सौ. मेघना चाळके यांनी अध्यक्षीय आभार मानले. प्रा. प्रकाश नाईक यांनी सुत्रसंचलन केले.
सुरवातीला मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत जेष्ठ आर्किटेक्ट परेश पाडगावकर यांनी सुपरमल्टिस्पेशालिटी प्रकल्पाचे विस्ताराने अप्रतिम असे पॅावर पाॅइंट प्रेझेंटेशन दिले.
या कार्यक्रमात मातृमंदिरच्या सतीश शिर्के (सीईओ)
, समीर हेगशेट्ये ( प्राचार्य आयटीआय), नरेंद्र चरकरी( आयटीआय), समीर जाधव(प्राचार्य कृषी विद्यालय),
अश्विनि कांबळे ( अधिक्षका, गोकुळ बालगृह), सुरेश घडशी (शेती), देसाई ( प्रसाद बालवाडी) , कांचन जाधव या काही प्रमुख कर्मचार्यांचा ना. उदय सामंत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
जागतिक आरोग्य दिना निमित्ताने देवरुख शहरातून ३५०-४०० मुलांची आरोग्य दिंडी काढण्यात आली. यात नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालय संगमेश्वर , शाळा नं२, आयटीआय , प्रा. मधू दंडवते कृषी विद्यालय, हायस्कूल आणि अन्य विद्यार्थी सहभागी होते. या आरोग्य जनजागरण रॅलीचे आयोजन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांच्या नेतृत्वाने आयोजित होते.
या कार्यक्रमाला बापू शेट्ये , उदय लोध, आत्माराम मेस्री , सुचेताताई कोरगावकर , अनिरूध्द निकम, माने मॅडम, सदानंद भागवत, वैजनाथ जागुष्टे, तहसीलदार सुहास थोरात, तालूका आरोग्य अधिकारी डॅा. शेरॅान थोरात, ब्लॅाक डेव्हलपमेंट ॲाफिसर नरेंद्र रेवंडकर, सीईओ विस्पूते, जेष्ट सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, अनिल अणेराव, विनय पानवलकर, नाना कोळवणकर, प्राचार्य प्रज्ञा कदम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com