चौपदरीकरणाच्या कामात दुर्घटना परशुराम घाटात दरड कोसळल्याने जेसीबी चालकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या परशुराम घाटात सुरू असलेल्या कामाच्या वेळी दरड कोसळण्याचा प्रकार घडला यावेळी दरडीखाली दोन जेसीबी गाडले गेले त्यात एका जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे दरम्यान या मार्गावरील वाहतूकही बंद असल्याचे कळते.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे (Parshuram Ghat) चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम करत असताना कापलेल्या डोंगराची अचानक दरड कोसळली. त्याचा भराव थेट तेथे काम करणाऱ्या जेसीबीवर आल्याने जेसीबी ढिगाऱ्यखाली अडकला आहे. जेसीबीमध्ये दोन कामगारअडकले होते यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, डोंगरावरील भराव खाली येण्याची शक्यता असल्याने परशुराम घाटातील वाहुतक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. दोन ते अडीच तास वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याला पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते-चेरणी मार्गे लोटे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button