आता नळपाणी योजनेच्या कंत्राटदारावर उपनगराध्यक्ष रोशन फाळके संतापले

रत्नागिरी नगर पालिकेच्या विस्तारित नळपाणी योजनेच्या कामातील दिरंगाईचा फटका थेट उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांना बसला आहे. प्रभाग क्र. १ मध्ये पाणी योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करून ठेवलेली आहे. रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. शहरातील खालच्या भागातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे. या भागात माणस राहात नाहीत का? असा सवाल उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करत नळपाणी योजनेच्या ठेकेदाराचे बील रोखा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
नगराध्यक्षांच्या जवळचा प्रभाग असलेल्या साळवी स्टॉपला दुसरी पाईपलाईन टाकण्याचे काम तत्काळ करून तत्परता दाखविण्यात आली. मग मी कोण आहे? मी उपनगराध्यक्ष असताना माझ्या प्रभागातील फगरवठार येथे पाईपलाईन टाकून रस्ता अडवून ठेवला आहे. त्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. पाणी योजनेच्या ठेकेदाराने ही कामे तत्काळ पूर्ण करावी, अन्यथा अनामत रक्कम जप्त करून घेण्याचे आदेश आपण द्यावेत अशी मागणी केली आहे www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button