
शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्यामुळे राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. राणे हे विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दादर येथील चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाआधीच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही असं म्हटल्याने या प्रकरणावरुन राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
विनायक राऊत यांनी ट्विटरवरुन राणेंवर टीका केलीय. “नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही.असे त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com