
लांजा जावडे मार्गावर एसटी व टेम्पो अपघातात सहा जण जखमी
एसटी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने टेम्पोमधील ६ जण जखमी होण्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी लांजा जावडे मार्गावर पालयेवाडी एसटी स्टॉप या ठिकाणी घडली.
सुनिल तुकाराम पिलके (वय 30 राहणार माजळ ) हा आपल्या ताब्यातील अॅपे टेम्पो घेऊन मााजळ ते कोंडये असा चालला होता. माजळ येथे काजूबी गोळा करणाऱ्या कामगारांना सोडण्यासाठी हा टेम्पो चालला होता. लांजा जावडे रोडवर सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांचा दरम्याने कोंडये पालयेवाडी स्टॉप नजीक टेम्पो आला असता लांजा वरून सुटणारी लांजा -कातळगाव या एसटी व टेम्पो दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
www.konkantoday.com