
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची माजी सभापती सौ. पूजाताई निकम यांच्या कडून पाहणी
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून माजी पंचायत समिती सभापती सौ. पूजाताई निकम यांनी पाहणी केली व दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या.
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सुरूवातीपासूनच म्हणावी तशी प्रगती दिसत नाही. संथगतीने काम होत असल्याने ज्या ठिकाणी रस्ता अपूर्ण राहिला आहे त्या ठिकाणी खड्डे पडले असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या कामाचा प्रारंभ झाल्याने माजी सभापती विद्यमान सदस्या सौ. पूजाताई निकम यांनी पाहणी केली व उत्तम दर्जाचे काम करण्याबाबतच्या संबंधित कंपनीच्या अधिकार्यांना सूचना केल्या.
www.konkantoday.com