
शॉक देऊन डुकराची शिकार करणाऱ्या ३ जणांना अटक
लांजा तालुक्यातील खेरवते येथे विद्युत तारेने शॉक देऊन डुकराची शिकार करणाऱ्या विशाल चव्हाण,विनोद जाधव,सुनील शिंदे राहणार खेरवसे या तीन जणांना वनविभाग यांनी ताब्यात घेतले आहे.सदरील आरोपीनी आंबा व नारळाच्या बागेत रान डुकराची शिकार करण्यासाठी विद्युत तारा लावून ठेवल्या होत्या.त्याचा शॉक लागल्यामुळे डुक्कर मेले त्यानंतर आरोपीं मांसाची विल्हेवाट लावताना वनविभागाचे अधिकारी प्रियांका लगड ,पाली वनपाल गोपी कांबळे,सागर तपाडे,वनरक्षक म.ग पाटील व विक्रम कुंभार या सर्वांनी सापळा रचून छापा टाकला व त्या ठिकाणी असलेला मुद्देमाल व साहित्य जप्त केले.
www.konkantoday.com