रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 47वर,आज 5 नवे रुग्ण सापडले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना हात पाय पसरू लागला आहे.दिवसेन दिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.आज सायंकाळी 7 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही.आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटर मधील आहेत. तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील येथील रहिवासी आहे. याव्यतिरीक्त लांजा येथील 2 लहान मुलांचा (वय 9 व 10 वर्षे) अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे जिल्हयातील अॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 47 झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button