कोकण रेल्वे मार्गावर पार्सल ट्रेन व ट्रॉलीची धडक ,जीवित हानी नाही

कोकण रेल्वे मार्गावर इंजिन आणि ट्रॉलीची धडक होऊन अपघात झाला. यात सुदैवाने जीवित हानी झााली नाही मात्र रेल्वे इंजिनचे नुकसान झाले. एर्नाकुलम ला जाणाऱ्या पार्सल ट्रेन चे इंजिन होते. विद्युतीकरण करणाऱ्या लार्सन अँड टुबरो या कंपनीचा बेजबाबदारपणा असल्याने कोकण रेल्वेनेे त्यांना ५ लाखांचा दंड ठोठावला आहे.कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहेप्रसिद्ध लार्सन आणि टूब्रो कंपनी हे काम करत आहे . आज दुपारी अडीचच्या सुमारास कंपनीच्या कामगारांनी अतिशय बेजबाबदारपणे काम करताना वापरणारी ट्रॉली मार्गावर आणली होती. याबाबतची कोणतीही कल्पना कोकण रेल्वेला देण्यात आली नव्हती . याचवेळी कोरोनाच्या आपदकाळात अत्यावश्यक सामान तसेच औषधे वाहून नेणारी एर्नाकुलम येथे जाणारी पार्सल ट्रेन भरधाव या मार्गावरून जात होती . तिची धडक ट्रॉली ला बसली. समोरून येणाऱ्या या भरधाव ट्रेनला पाहून कामगारांनी बाजूला उड्या घेतल्या यामुळे ते वाचले .राजापूर आणि वैभववाडी दरम्यान 282/23 किलोमीटरवर हा अपघात घडला आहे .मात्र यामध्ये पार्सल ट्रेनच्या इंजिनचे नुकसान झाले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button