माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले यांचे पुत्र नावीद अंतुले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर.अंतुले यांचे पुत्र नावीद अंतुले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नावीद अंतुले यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन प्रचार प्रसाराचे काम केले होते.
लॉक डाऊन असल्यामुळे त्यांचा दफनविधी मुंबईत होणार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button