
विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 52.50 रुपयांनी स्वस्त
होळीच्या पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) 52.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आतापर्यंत 893.50 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मार्च महिन्यापासून 841 रुपयांना मिळेल. फेब्रुवारीच्या मध्यावर यामध्ये 144.50 रुपयांची वाढ झाली होती. नवे दर रविवारी सकाळपासून लागू झाले आहेत.मासिक रेट रिव्हीजनमध्ये तेल कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडरच्या (19 किलोग्रॅम) दरातही 84.50 रुपयांची कपात केली आहे. व्यावसायिकांना कमर्शियल सिलेंडरसाठी आता 1465.50 रुपये मोजावे लागतील. पाच किलो वाला छोटू सिलेंडर सुद्धा 18.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. छोटू सिलेंडर आता 308 रुपयांना पडेल.
www.konkantoday.com