अपत्यप्राप्तीचे व भूताटकीचे काढण्याचे आश्वाासन देऊन दागिने चाेरणार्या भोंदू काझीला साडेतीन वर्षाची शिक्षा


गुहागर येथील एका कुटुंबाला अपत्यप्राप्ती करून देण्याचे व भुताटकी काढण्याची ग्वाही देत सव्वा लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्याय भोंदू मुश्ताक इसा काझी याला गुहागर न्यायालयाने साडेतीन वर्षे साधी कैद व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
गुहागर तालुक्यातील पडवे रहिम मोहल्ला येथे ६ ते २३ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत हा गुन्हा घडला होता. माझगांव मुस्लिम मोहल्ला येथील भोंदूबाबा आरोपी मुश्ताक इसा काझी याने पडवे रहिमत मोहल्ला येथील नाजिया अबिद तवसाळकर, कौसर मकबूल तवसाळकर यांचा विश्वा्स संपादन केला. फिर्यादीची मुलगी असमिना हिचा जुना आजार बरा करतो तसेच साक्षीदार महिलांना अपत्यप्राप्ती करून देतो असे सांगितले. फिर्यादीच्या मुलीला झपाटले असल्याचे सांगत तिच्यावर चाळीस दिवस अंमल करावा लागेल असे सांगितले. यावर उपाय करताना भोंदू काझी याने फिर्यादीच्या घरात जावून त्यांचे सोन्याचे दागिने मागून घेवून ते ऍल्युमिनियमच्या भांड्यात ठेवून नंतर त्याने चोरून नेले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button