
गायिका श्रुती सडोलीकर यांची
24 ला शास्त्रीय गायन कार्यशाळा
आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीच्या सहकार्याने ज्येष्ठ गायिका विदुषी श्रुती सडोलीकर यांची शास्त्रीय गायनाची कार्यशाळा 24 ला होणार आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत कार्यशाळा होईल. कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
जयपूर अत्रौली घराण्याच्या अध्वर्यू विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर या भारतीय शास्त्रीय संगीतातील महत्त्वाचे नाव. त्या पंडित वामनराव सडोलीकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांची प्रथमच कार्यशाळा होत आहे आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी शास्त्रीय संगीत मैफली, कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात. शास्त्रीय संगीताच्या प्रचार, प्रसारासाठी संस्था योगदान देत आहे.
रत्नागिरीमध्ये सध्या शास्त्रीय संगीताकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो आहे. यानिमित्ताने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे. या मध्ये शास्त्रीय संगीत शिकणार्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना विनामोबदला प्रवेश दिला जाईल. तसेच जे विद्यार्थी शास्त्रीय संगीत शिकत आहेत, त्यांना शाळेतूनच पाठवण्यात यावे. याकरिता शाळेतून सुट्टी मिळावी, अशी विनंती सर्व शाळांना ‘आसमंत’तर्फे करण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन आसमंत फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे.
www.konkantoday.com