वळके ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. उत्तम सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान


. रत्नागिरी – सन्मान मंच आयोजित राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा 2026 मध्ये रत्नागिरी तालुक्यातून वळके ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. उत्तम लक्ष्मण सावंत यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी वळकेचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. संजय दळवी यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सन 2026 मध्ये वळके गावच्या विकासासाठी केलेल्या अमूल्य कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे संस्थेच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सरपंच श्री.उत्तम सावंत म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा एकट्याचा नसून वळके येथील सर्व ग्रामस्थांचा आहे. याचे सारे श्रेय वळकेचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व कमिटी पदाधिकारी, तंटामुक्त समिती, सावित्री महिला ग्रामसंघ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग कर्मचारी, आशा, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोलीस पाटील, सी आर पी, यांचे उत्तम सहकार्य व केलेल्या कामाची पोचपावती आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे हे यश आहे.”
हा पुरस्कार म्हणजे पुढील कार्यास दिलेले प्रोत्साहन असून आणखी प्रभावीपणे गावच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button