विमानात बसले, बिघाड झाला अन् गोव्याला बसने पोहोचले प्रवाशी, चिपी विमानतळावर


सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानातील एसी बंद पडल्याने प्रवाशांना तब्बल दोनदा विमानातून खाली उतरवण्यात आलं. अखेर बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने सर्व प्रवाशांना बसनं गोव्याच्या मोपा विमानतळावर रवाना करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, विमानात बसल्यानंतर एसी यंत्रणा सुरू नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलं. काही वेळानं त्यांना पुन्हा विमानात बसवण्यात आलं, पण तांत्रिक बिघाडाचं कारण देत दुसऱ्यांदा खाली उतरवण्यात आलं.

बसने प्रवाशांना गोव्याला पाठवलं

हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी गोव्याहून अभियंत्यांना पाचारण करण्यात आलं. मात्र, नेमका बिघाड काय आहे आणि विमान कधी उड्डाण घेणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्याने प्रशासनाने प्रवाशांसाठी बसची व्यवस्था केली आणि त्यांना पुढील प्रवासासाठी गोव्यातील मोपा विमानतळावर नेण्यात आलं. फ्लाय 91 कंपनीचे ही विमानसेवा होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button