तिरुपती मंदिराला 121 किलो सोनं आणि हिऱ्यांचे दागिने असं मोठं दान देणारे वर्धमान जैन कोण आहेत?


तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामींना 121 किलो सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने अर्पण करण्यात आले.या दागिन्यांची किंमत सुमारे 207.6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चेन्नई येथील व्यावसायिक वर्धमान जैन आणि राधिका जैन यांनी हे दागिणे अर्पण केले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत तिरुमला मंदिरात हे दागिने अर्पण करण्यात आले.

तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) जनसंपर्क अधिकारी रवी यांनी बीबीसीला सांगितलं की, भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूळ मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत सजवण्यासाठी सोन्याचे आणि हिऱ्यांचे 46 प्रकारचे दागिने भेट म्हणून देण्यात आले आहेत.

त्यांनी सांगितलं की, यापैकी 106 किलो सोन्यापासून तिरुमला येथील देवीसाठी दागिने तयार करण्यात आले आहेत. तर उर्वरित 15 किलो सोन्यापासून तिरुचनूर येथील श्री पद्मावती देवीसाठी सुवर्णवस्त्रे तयार केले जाणार आहेत.TTDतिरुपती तिरुमला देवस्थानमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 9 दशकांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं दान स्वरुपात मिळालं आहे.
टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी, टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी (ईओ) एल. व्ही. सुब्रमण्यम आणि माजी मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रमण दीक्षितुलू यांनी बीबीसीला सांगितलं की, 1933 मध्ये ब्रिटिश राजवटीत तिरुमला तिरुपती देवस्थानमची (टीटीडी) स्थापना झाली. त्यानंतरच्या गेल्या 9 दशकांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं दान स्वरुपात मिळालं आहे.

रमण दीक्षितुलू यांनी म्हटलं की, श्रीकृष्णदेवराय यांच्या काळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने दान करण्यात आले आहेत.

ते म्हणाले की, आधुनिक इतिहासात एकाच वेळी सर्वाधिक सोन्याचे दागिने दान करणारी व्यक्ती म्हणून वर्धमान जैन यांची नोंद होईल.र्धमान जैन हे चेन्नई येथील एशिया इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक आहेत.
वर्धमान जैन हे चेन्नई येथील एशिया इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक आहेत.

ते हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांना बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) सेवा देणाऱ्या ॲक्सेस हेल्थकेअर या कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळाचे उपाध्यक्षही आहेत.

टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी यांनी बीबीसीला सांगितले, “वर्धमान जैन हे तिरुमला श्रीवारीचे मोठे भक्त आहेत. साधारण 15 महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स विकून काही हजार कोटी रुपये कमावले होते. त्याच वेळी त्यांनी देवाला मोठी भेट अर्पण करण्याचा संकल्प केला होता.”

याच संकल्पानुसार त्यांनी देवासाठी 106 किलो सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, तर देवीसाठी 15 किलो सोन्याचे दागिने तयार करण्याचे नियोजन केले.

हे दागिने चेन्नईतील एका नामांकित कंपनीने तयार केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button