
कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
नवी मुंबईत एक खळबळजनक घटना घडली. कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत आरोपीचा जागीच मृत्यू झाला. बेलापूर कोर्टात ही खळबळ घटना घडलीशिक्षा ऐकताच आरोपीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे कोर्टात गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील कोर्टात आज दुपारी ही अत्यंत धक्कादायक घटना घडली. हत्येच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर काही वेळातच आरोपीने कोर्टाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरोपीचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हत्येच्या गुन्ह्यातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने संबंधित आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निकाल ऐकल्यानंतर आरोपी प्रचंड मानसिक तणावाखाली गेला होता. याच तणावातून त्याने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून कोर्टा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे




