त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मिरजोळीतील नाना पीर दर्ग्यात उरूस उत्साहात साजरा!

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतले दर्ग्याचे दर्शन

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील अन्वर शमशुद्दीन पीर तथा नाना पीर दर्ग्यात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक उरूस उत्साहात संपन्न झाला. या उरुसाला मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. धार्मिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन यानिमित्ताने घडले.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी या दर्ग्यात उरूस साजरा केला जातो. यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के फैसल मेमन आदी उपस्थित होते

धर्माच्या सीमा ओलांडून एकत्र येणाऱ्या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमुळे या उरुसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परंपरेचा वारसा जपणारा हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button