गोकुळ’च्या माजी अध्यक्षाच्या मध्यधुंद पुत्राने दोघांना उडवले; मामे बंधू जागीच ठार झाल्याने कोल्हापुरात हळहळ!

कोल्हापूर : मद्यधुंद मोटारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहनाने येथे दुचाकीला उडवले. या अपघातात उमेश विलास पाथरूट (वय ३२), गणेश सुनील पाथरूट (वय ३४, रा. दोघे कोल्हापूर) या मामेभावांचा जागीच मृत्यू झाला.

मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातप्रकरणी गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह पाटील (वय ३६, रा. ताराबाई पार्क,कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मसिंह पाटील हा रात्री महामार्गावरील आपल्या हॉटेलमधून घरी परतत होता. तर सायबर चौकात राहणारे मामे भाऊ गणेश व उमेश पाथरूट हे दोघे शाहू टोल नाका येथे पानटपरीत पान घेण्यासाठी निघाले होते.

मद्यधुंद चालक पद्मसिंह पाटील याचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पाथरूट बंधू उडून डोक्यावर आपटले गेले. त्यांना गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. घटनास्थळावरून मोटारचालकाने पलायन केले. त्याने घरी जाऊन नातेवाइकांना घडलेल्या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली, तसेच पद्मसिंह याने अपघात केल्याचे सांगितले.

कुटुंबांचा आधार तुटला

दोघे मृत मामेभाऊ गरीब घरातील असून कुटुंबांचा ते आधारवड होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि साळुंखे तपास करत आहेत.

देवतांना आकार देणारे हात

दगडाला आकार देत त्यातून तुळशीचा कट्टा, देव देवतांच्या मुर्ती, नक्षीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिवार्ह करणारे दोघे मामेभाऊ आत्तेभाऊ रविवारी रात्री झालेल्या अपघात ठार झाल्याने सायबर चौकातील प्रत्येक घरातील महिलांच्या डोळयातून अश्रू वाहत होते, रात्री बारा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पाथरुट गल्लीतील एकही व्यक्ती रात्रभर झोपला नाही. शिवाजी विद्यापीठाजवळील अपघातस्थळ आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी झाली होती. ज्याने अपघात केला त्याला आमच्या ताब्यात द्या, निष्पाप जीवांना मारण्याचे त्यांना लायसन्स कोणी दिले असा संतप्त सवाल केला जात होता. सायबर चौकातील पाथरुट गल्लीत राहणारे गणेश पाथरुट व उमेश पाथरुट हे मामेभाऊ घरचे अठराविश्व दारिद्रय असल्याने लहानपणापासून शिक्षणाला रामराम ठोकून ते दगडातून नक्षीकाम करुन,देवतांच्या मुर्ती घडवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

गणेशला १५ व १२ वर्षाची दोन मुले,पत्नी व आई वडील,एक भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षापूर्वी त्याने कर्ज काढून पाथरुट गल्लीत स्लॅबचे घर बांधले होते. आई वडील वृध्द झाल्याने घराची जबाबदारी त्याच्यावर होती.तर उमेश पाथरुटला तीन वर्षाचा १ मुलगा, गर्भवती पत्नी, वडील,एक भाऊ,बहिण असा परिवार आहे. वडीलांना काम जमत नाही, भाऊ शिक्षण घेत असल्याने उमेश घरातील कर्ता पुरष होता. कामावर जाता यावे यासाठी दोन महिन्यापूर्वी त्याने बॅँकेतील लोन काढून मोपेड घेतली होती. आपल्याला अल्पआयुष्य लाभेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसावे.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गणेश व उमेश जेवन करण्यासांठी शाहू टोल नाका परिसरातील हॉटेलमध्ये गेले होते, जेवन करून पान खाण्यासाठी टपरीकडे जात असतानाच मदद्यधुंद कार चाकाने त्यांना जोराची धडक देऊन उडवले. दोघे भाऊ वर उडून खाली डोक्यावर आपटल्याने डोक्यात आतील बाजूस रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कार चालक पद्मसिंह रणजितसिंह पाटील हा तेथून कारसह पळून गेला. अपघातातील बेशुध्द भावांना प्रारंभी खासगी व त्यानंतर सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर ते मृत झाल्याचे घोषीत केले. सीपीआर रुग्णालयासह अपघातस्थळी नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष डोके व पोलीसांचे पथक गर्दीवर नियंत्रण करीत होते. जमावाला शांत करीत होते.

अपघाताची जबाबदारी स्विकारली

अपघात झाल्यानंतर संशयीत कार चालक पद्मसिंह पाटील ताराबाई पार्क येथील घरी गेला. त्याने आपल्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. पाटील कुटुंबिय अपगात स्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस व तेथील जमावाला आपल्या बंधूकडून अपघात झाल्याची कबुली दिली. त्यामुळेच अपघातातील कारचा शोध घेण्यासाठी पोलीसांना धावपळ करावी लागली नाही.

अटकेसाठी नातेवाईक आक्रमक

दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या कार चालकाला अटक करा,त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईक व मित्रांनी घेतली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी संशयीत पद्मसिंह पाटील यास अटक केली. मृताच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संयुक्त सायबर चौक, कला क्रिडा सांस्कृतिक तरुण मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button