आंतरविभागीय खो-खो मुले व मुली स्पर्धेत मुंबई उपनगर विभागाला अजिंक्यपद

लांजा : मुंबई विद्यापीठ आणि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविभागीय खो-खो (मुले व मुली) स्पर्धेत मुंबई उपनगर विभागाच्या मुले व मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत अजिंक्यपद पटकावले, तर यजमान कोकण विभागाने दोन्ही गटांत द्वितीय क्रमांक मिळवला. ठाणे विभागाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
लांजा येथील वंचारे महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि कोकण या चार विभागांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या वतीने नियुक्त केलेल्या निवड समितीने अत्यंत चोख कामगिरी बजावली. मुंबई उपनगर विभागाच्या मुले व मुलींच्या संघानी चांगला खेळ केला. मुलींच्या गटात अव्वल कामगिरी नोंदवली. तर कोकण विभागाच्या मुलींनी ठाणे, मुंबई शहरचा पराभव करून उपविजेतेपद पटकावले. तर उपनगरबरोबरचा सामना चुरशीचा झाला.
या स्पर्धेतून मुंबई विद्यापीठाचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यासाठी निवड समिती अध्यक्ष म्हणून राहुल अकुल यांची, तर सदस्य म्हणून प्रशांत पाटणकर, शशांक उपशेट्ये आणि डॉ. नरेंद्र कुंदर यांनी काम पाहिले. मुलींच्या स्पर्धेसाठी शशांक उपशेट्ये हे निवड समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. श्रीमती रोहिणी डोंबे, प्रशांत पाटणकर आणि डॉ. नरेंद्र कुंदर यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी आमदार किरण सामंत यांच्यासह न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष जयवंत भाऊ शेट्ये, उपाध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरूप, सेक्रेटरी महेश सप्रे, संस्थेचे सीईओ भाऊसाहेब वंजारे आणि संचालक मंडळातील संजय तेंडुलकर हे उपस्थित होते. तसेच प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील यानीही उपस्थिती दर्शविली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button